www.24taas.com, नागपूर
नागपूर विभागातल्या सहा जिल्ह्यांमध्ये मेंदूज्वराचा उद्रेक झाला असून त्यामुळे गेल्या एका महिन्यात सतरा बालकांचा मृत्यू झालाय.
नागपूर जिल्ह्यात एकूण ४६ बालकांना या रोगाची लागण झाली होती. त्यापैकी भंडारा जिल्ह्यातील सहा बालकांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंत मेंदूज्वरामुळे सर्वात जास्त मृत्यू भंडारा जिल्ह्यात झालेत. चंद्रपुरात पाच, नागपुरात तीन, वर्ध्यात दोन तर गडचिरोलीत एकाचा मृत्यू झालाय.
ताप येणं, डोळे गरगरणं अशी लक्षणं या रोगात दिसून येतात. एक वर्ष ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना या रोगाची बाधा होते आणि तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना यापासून सर्वात जास्त धोका संभवतो. ‘सँड फ्लाय’ नावाच्या किड्यापासून हा रोग पसरतो आणि दमट वातावरणात त्याची वाढ होते.