कापसाबाबत निर्णयास विलंब - शरद पवार

कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: Mar 10, 2012, 07:52 PM IST

www.24taas.com, नाशिक

कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.  काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी  स्पष्ट केलं आहे.

कापसावरील निर्यातबंदीला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची संमती असल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींनी केलाय. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं जोशींनी सांगितलंय. तसंच अफूप्रकरणी राष्ट्रवादी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. कापूस निर्यातबंदीबाबत निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर घोषणा केली जाईल, असं सांगत निर्यातबंदी उठवण्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत. त्याचबरोबर पुणे पॅटर्न जुना झाल्याचं सांगत नाशिकमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ठाण्यातील पळवापळवी नवी नाही

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीनं केलेली कामगिरी ही गेल्या निवडणुकीपेक्षा सरस असल्याचं पक्षाध्यक्ष शरद पवारांनी नाशिकमध्ये म्हटलं आहे. पक्षाच्या यशापयशाच्या उहापोहानंतर नाशिकमध्ये आलेल्या पवारांनी यावेळी राज्याच्या राजकीय परिस्थितीपासून कापूस निर्यातबंदीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. ठाण्यामध्ये झालेली नगरसेवकांची पळवापळवी हा काही नवा प्रकार नसल्याचं सांगत त्यांनी या प्रकाराचं एकप्रकारे समर्थनच केल आहे.

पुणे पॅटर्न हा जुना विषय

नाशिकमध्ये सत्ता स्थापन कऱण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना असं समीकरण जुळणार का, या प्रश्नावर पुणे पॅटर्न हा जुना विषय झाला असून आता केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी हेच समीकरण राज्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. कापसावरची निर्यातबंदी उठण्याचे संकेत देत, निवडणूक आयोगाच्या तांत्रिक परवानगीनंतर याबाबतची घोषणा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एकूणच पवारांनी नाशिकमध्ये पुणे पॅटर्न राबवणार नसल्याचे संकेत देऊन आणि कापूस निर्यातबंदीबाबत कुठलीही ठोस घोषणा न करून सगळ्यांचीच उत्सुकता ताणून ठेवली आहे.

व्हिडिओ पाहा....

[jwplayer mediaid="63113"]