सरकारी खात्यांनी वर्तवलेले अंदाज अचूक येणं हा चमत्कार मानला जातो आणि प्रादेशिक साखर संचालनालय त्याला अपवाद कसा असू शकतो. संचालनालयाचा अहवाल आणि लागवडीखालील उसाचे क्षेत्र यात मोठी तफावत आहे. नगर जिल्ह्यातील नगर तालुका वगळता १९ साखर कारखान्यांना पुरेल इतका ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे.
चालू हंगामात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हं आहेत. मागील गाळप हंगामात देखील ऊस शेतात पडून राहिल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप झाला होता. मात्र दक्षिण नगर जिल्ह्यात जगदंबा आणि साईकृपा कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप केल्यास उसाचा तुटवडा भासू शकतो. मागच्या वर्षी उसाचा तुटवडा भासल्याने मराठवाड्यात साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस पळवला होता. त्याचीच पुनरावृत्ती दक्षिण नगर जिल्ह्यात यंदा होण्याची शक्यता आहे.