'कांतारा 2' Teaser: शिवाच्या रुपात परतला ऋषभ शेट्टी; रक्तबंबाळ रुपात हाती त्रिशुळ...पाहा थरारक व्हिडीओ

Kantara 2 Teaser : 'कांतारा 2' चा टीझर प्रदर्शित; शिवच्या रुपात ऋषभ शेट्टीचं कमबॅक

दिक्षा पाटील | Updated: Nov 19, 2024, 12:01 PM IST
'कांतारा 2' Teaser: शिवाच्या रुपात परतला ऋषभ शेट्टी; रक्तबंबाळ रुपात हाती त्रिशुळ...पाहा थरारक व्हिडीओ  title=
(Photo Credit : Social Media)

Kantara 2 Teaser : जेव्हा पासून 'कांतारा 2' ची घोषणा झाली तेव्हापासून प्रेक्षक आतुरतेनं याची प्रतीक्षा करत आहेत. नुकताच त्यांनी 'कांतारा 2' चा टीझल शेअर केला आहे. या टीझरला पाहून प्रीक्वल आणखी उत्साह वाढला आहे. त्याचं कारण म्हणजे हा पहिल्या भागापेक्षा काही वेगळा असणार असल्याचं त्यातून दिसून आलं आहे. 'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' टाइटलसोबत 82-सेकंदाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत ऋषभ शेट्टीच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील काही सीन्स घेत एक पटकथा दाखवण्यात आली आहे. 

टीझरमध्ये सुरुवातीला 'तो क्षण आलाय.संपूर्ण जंगलातून आवाज येतोय', हे डायलॉग ऐकायला येतात. काही काळानंतर सगळं ब्लर होतं आणि ऋषभ शेट्टी हा मशाल धरून दिसतो. त्याच्या आजुबाजूला आग असते आणि ऐकायला येतं की , 'प्रकाश! प्रकाशात सगळं काही स्पष्ट दिसतं. पण हा प्रकाश नाही. हे एक दर्शन आहे! एक दृष्टी जी आपल्याला दाखवते की काल काय झालं होतं आणि काय आहे आणि काय होणार! तुम्ही पाहू शकत नाही का? अंधारात शिवचा चेहरा दिसतो. टीझरमधून हे देखील दिसून येतं की ही गोष्ट कदंब राजवंशच्या शासन काळातील आहे. पौर्णिमेचा चंद्र एका गुफेत दिसतो. त्रिशूल आणि रक्तबंबाळ व्यक्ती. गळ्यात रुद्राक्ष आणि लांबसडक केसं पाहता ऋषभचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य धालं. जेव्हा त्याचा चेहरा आणि त्यातही त्याचे डोळे दिसतात तेव्हा डोळ्यांमध्ये अंगारे दिसतात. 

ऋषभ शेट्टीनं लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा पहिला भाग हा 2022 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता. 'कांतारा अ लीजेंड चैप्टर 1' हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 च्या गांधी जयंतीच्या निमित्तानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा : Nayanthara ला धनुषच्या टीमनं दिला 24 तासांचा अल्टीमेटम; तर नेटफ्लिक्सला धमकी

होम्बले फिल्मसच्या बॅनर अंतर्गत विजय किरागांदुरचा कांतारा 2 हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.