बस ड्रायव्हरला मारहाण

बसला कारचा धक्का लागल्यानं कारचालकासह चौघांनी बसचालक वामन अहिरेंना गाडीतून ओढून बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील एकही प्रवासी अहिरे यांच्या मदतीला धावला नाही.

Updated: Feb 27, 2012, 07:58 AM IST

www.24taas.com, जळगाव

 

एसटी बस ड्रायव्हरला इंडिका कारचालकासह चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना जळगावमध्ये घडली. बसला कारचा धक्का लागल्यानं कारचालकासह चौघांनी बसचालक वामन अहिरेंना गाडीतून ओढून बेदम मारहाण केली.

 

यावेळी बसमधील एकही प्रवासी अहिरे यांच्या मदतीला धावला नाही. मारहाणीच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानाकात चक्काजाम आंदोलन केलं. तब्बल दोन तास जळगाव बसस्थानकात हा गोंधळ सुरु होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

दरम्यान या घटनेत मारहाणीत बेशुद्ध झालेला एसटी बसचालक वामन अहिरे, याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.