एसटीत १९ हजार भरती होणार- मुख्यमंत्री

एसटी महामंडळाचे खाजगीकरण करणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शिवाय १९ हजार नोकरभरती करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Updated: Mar 25, 2012, 06:39 PM IST

www.24taas.com, सांगली

एसटी महामंडळाचे खाजगीकरण करणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शिवाय १९ हजार नोकरभरती करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

तसंच साडेतीन हजार नव्या एसटी बसेस विकत घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. सांगलीत एसटी महामंडळाच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान याच कार्यक्रमात एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांचा कार्य़क्रम कामगारांनी उधळल्याची घटना सांगलीत घडली आहे.

कामगारांनी गोंधळ घालत परिचारक यांचं भाषण बंद पाडलं. कनिष्ठ वेतनश्रेणीबाबत चुकीची माहिती दिल्यानं संतप्त कामगारांनी हा गोंधळ घातला. आता मुख्यमंत्र्यांनी १९ हजार एसटीत नोकरभरती करणार असं घोषित केलं आहे. पण त्यांची अंमलबजावणी कधी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.