विठ्ठलाला नको वज्रलेप, संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती.

Updated: Jan 17, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com, पंढरपूर

विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती.

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुर्तीचा पदस्पर्श, दर्शन आणि महापुजा या कारणांमुळे पंढरपुरच्या विठ्ठल मुर्तीची होणारी झीज रोखण्यासाठी मंदिर समितीने मुर्तीवर वज्रलेपनाचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाला विठ्ठलभक्तांनी विरोध दर्शवला आहे.

इपॉक्सी नावाच्या रासायनिक प्रकियेद्वारे करण्यात येणारी ही वज्रलेपनाची पद्धतच चुकीची असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं याला विरोध दर्शवत वारकऱ्यांनी विठ्ठल मंदिरासमोर  ठिय़्या आंदोलन पुकारलं आहे.

वारकरी, दिंडीकरी, फडकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे. पुरातत्व खात्याकडून मूर्तीला वज्रलेप करावा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.