प्रेमाचा रंग अस्तित्वातच नाही

प्रेमाचा आणि त्यातही स्त्रियांचा लाडका रंग म्हणून गुलाबी रंगाला मान्यता आहे.पण, गंमत म्हणजे गुलाबी रंग हा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. नुकताच शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की गुलाबी रंग हा दृष्टीभ्रम आहे.

Updated: Mar 10, 2012, 02:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

प्रेमाचा आणि त्यातही स्त्रियांचा लाडका रंग म्हणून गुलाबी रंगाला मान्यता आहे.पण, गंमत म्हणजे गुलाबी रंग हा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. नुकताच शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की गुलाबी रंग हा दृष्टीभ्रम आहे.

शास्त्रावर आधारीत असणाऱ्या रेडिओलॅब या रेडिओ शोचे प्रस्तुतकर्ता रॉबर्ट क्रुलविच यांच्या मते गुलाबी रंग हा लाल आणि वांगी रंग यांच्या मिश्रणातून जाणवणारा रंग आहे.

मुळातच रंग हे डोळे आणि मेंदू यांच्या भासातून निर्माण होणारी गोष्ट आहे. जेव्हा आपण गुलाबी रंग पाहातो, तेव्हा प्रत्यक्षात तो गुलाबी रंग नसतोच. प्रकाशाच्या खेळामुळे काही प्रकाश किरणं वस्तूवर परावर्तित होतात आणि त्यातून त्या वस्तूचा रंग गुलाबी असल्याचा भास होतो.