ऍपलचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांना पुढच्या वर्षी मरणोत्तर ग्रॅमी ट्रस्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीताचा आस्वाद घेण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करण्याच्या योगदानाबद्दल जॉब्स यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रेकॉर्डिंग इंजिनिअर रुडी वॅन गेल्डर आणि संगीतकार डेव बार्थोलोम्यु यांच्यासह जॉब्स यांना ग्रॅमीच्या वार्षिक समारंभात १२ फेब्रुवारीला सन्मानित करण्यात येईल.
जॉब्स यांच्या आय पॉड आणि ऑनलाईन आय ट्युन स्टोरने संगीत विश्वात क्रांती घडवली. संगीताचे वितरण आणि विक्री यात क्रांतीकारक बदल घडवले असं रेकॉर्डिंग अकाडमीने ग्रॅमीच्या वेबसाईटवर नमुद केलं आहे. रेकॉर्डिंगच्या क्षेत्रातील तांत्रिक योगदानासाठी ऍपल कॉम्प्युटर्स इनकॉर्पोरेशनला २००२ साली टेक्निकल ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता.