भारताची ऍथलेटिक्स अंजू जॉर्ज हैदराबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराज्यीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. तिच्या नव्याने मैदानात येण्यामुळे पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
अॅथलेटिक्समधील लांब उडी प्रकारात अंजू जॉर्जने चांगले नाव मिळविले आहे. मात्र, अंजूला श्वासोच्छवासाचा त्रास झाला. त्यामुळे श्वासोच्छवासाच्या त्रासाने त्रस्त असल्यामुळे ती खेळापासून दूर गेली होती. मात्र, ती या आजारातून बाहेर आल्याने ती पुन्हा मैदानावर झेप घेण्यास तयार आहे. दरम्यान, मी प्रशिक्षण सुरू केले आहे. मात्र, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती शंभर टक्के बरी झालेली नाही, अशी माहिती तिने हैदराबादमध्ये पत्रकारांना दिली.
६.८३मीटर लांब उडी मारण्याचा विक्रम करणारी अंजू स्पर्धेत परतण्याची तयारी करत आहे. ती सध्या युरोपात होणाऱ्या स्पर्धांची प्रतिक्षा करत आहे.