www.24taas.com, मेघा कुचिक, मुंबई
टेनिसची पंढरी मानल्या जाणा-या विम्बल्डनसह चारही ग्रँड स्लॅममध्ये गेली जवळपास 18 वर्ष नितिन कन्नमवार भारताचं प्रतिनिधित्व करताहेत. नितिन कन्नमवार हे जागतिक दर्जाचे टेनिस रेफ्री असून ते जगभरातील महत्त्वाच्या टूर्नामेंटमध्ये रेफ्रीची भूमिका चोख बजावताहेत.
जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये एखाद्या प्लेअरप्रमाणे रेफ्रीही देशाचेच प्रतिनिधित्व करत असतात...मुंबईचे नितीनं कन्नवार गेल्या 18 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस रेफ्री म्हणून भारताचं नाव उंचावत आहेत. विम्बल्डन, ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन या चारही ग्रँड स्लॅममध्ये नितीन कन्नमवार यांनी चेअर अंपायरिंग केलीय.
कन्नमवार यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीमुळेच इंटनॅशनल टेनिस फेडरेशनने त्यांच्यावर एशियन झोनलच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवलीय. रेफ्रीची एक चुक मॅचचा निकाल फिरवू शकते..मात्र नितीन यांनी ही जबाबदारी ग्रँड स्लम आणि ऑलिंपिकमध्येही चोख आणि अचूक पार पाडलीय...