www.24taas.com, अमर काणे मुंबई
रॉजर फेडरर, राफाएल नदाल यांच्यासाऱख्या मातब्बर टेनिस प्लेअर्सचं टेनिसमधील साम्राज्य हादरवले ते सर्बियन नोव्हाक जोकोविचनं. जोकिवचनं आज टेनिसमध्ये अव्वल स्थानही काबीज केलंय. जोकोविचच्या या यशात मोलाचा वाटा राहिला तो एका मराठमोळ्या डॉक्टरचा. मुंबईच्या डॉक्टर श्रीपाद खेडेकरांच्या होमिओपॅथी उपचारांमुळेच जोकोविचला आपल्या दम्यावर नियंत्रण मिळवता आलं.
नोव्हाक जोकोविचनं धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर टेनिस विश्वात अव्वल स्थान काबीज केलं. जोकोविचच्या झंझावातानं फेडरर, नादालसारख्या मातब्बर प्लेअर्सलाही नमवलं. सर्बियनं प्लेअर्सच्या या जबरदस्त यशात मोलाचा वाटा आहे तो एका मराठमोळ्या डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांचा. जोकोविचला एक्झरसाईझ इड्युस्ड अस्थमानं त्रस्त होता. त्यामुळे टेनिससारख्या दमछाक करणाऱ्या खेळात जोकोविचच्या खेळावर परिणाम व्हायचा लागला. तेव्हाचं जोकोविचची भेट झाली डॉक्टर श्रीपाद खेडेकर यांच्याशी. २०१० मध्ये जोकोविचनं बेलग्रेडला डॉक्टर श्रीपाद यांच्याकडून होमिओपॅथी उपचार सुरु केला आणि लगेचच या उपचारांचा फायदाही जोकोविचच्या खेळात दिसायला लागला.
जोकोविच सातत्यानं डॉक्टर श्रीपाद यांच्याशी संपर्कात असतो किंबहुना आपल्या मॅचेस पाहण्यासाठी डॉक्टर श्रीपाद यांना खास आमंत्रणही पाठवतो. जोकिवचशिवाय टेनिसचे आणि फुटबॉलचे अनेक स्टार डॉक्टर श्रीपाद यांच्याकडून उपचार घेताय. एखादा आजार खेळाडूची कारकीर्द धोक्यात आणतो. जोकोविचही दम्यामुळे बेजार होता. मात्र, मुंबईकर डॉक्टरच्या औषधोपचारांमुळे जोकोविचला अॅडव्हानटेज मिळाला आणि आज तो टेनिसविश्व गाजवतोय.
.