www.24taas.com, कोलकाता
वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन मित्र आता एकमेकांवर वार करायला सिध्द झाले आहेत. सेहवागच्या कॅप्टन्सीखालील दिल्ली डेअरडेविल्स आणि गंभीरच्या कॅप्टन्सीखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रणसंग्राम पहायला मिळणार आहे.
दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ईडन गार्डनवर आमने-सामने येणार आहेत. गेल्या दोन सीझनमध्ये दिल्लीची टीम फारशी चमकदार कामगिरी करू शकलेली नाही. मात्र वीरेंद्र सेहवाग आणि डेविड वॉर्नर क्लीक झाले तर डेअरडेव्हिल्स कोणत्याही टीम्सला लोळवण्याची क्षमता ठेवतात. युसूफ - इरफान पठाण या पठाण ब्रदर्समधील फाईट या मॅचचं विशेष आर्कषण ठरणार आहे. केकेआरच्या बॅटिंग लाईन-अपमध्ये कॅप्टन गौतम गंभीर, कॅलिस बरोबरच स्फोटक बॅट्समन ब्रेंडन मॅककलमही आहे.
तर युसूफ पठाण हा हार्ड हिटिंग बॅट्समनही कोणत्या क्षणी मॅचचं पारडं आपल्या टीमच्या बाजूने झुकवू शकतो. ब्रेट ली आणि लक्ष्मीपती बालाजी हे डेअरडेविल्सच्या बॅट्समनवर वेगवान मारा करतील. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीमसमोर वॉर्नर नसल्यामुळे सेहवागबरोबर ओपनिंगला कोण येणार याची चिंता आहे. त्यातच महेला जयवर्धने आणि केविन पीटरसन हे अनुभवी बॅट्समनही त्यांच्याकडे नसणार आहेत.
त्यामुळे याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे. बॉलिंगची धुरा इरफान पठाण, मॉर्ने मॉर्केल आणि अजित आगरकर सांभाळतील. तर उमेश यादव आणि वरूण एरॉन यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जबरदस्त कमबॅक केल्यामुळे किंग खानच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता या लढाईत सेहवाग की गंभीर या दोन मित्रांपैकी कोण बाजी मारतो याकडेच क्रिकेट फॅन्सच लक्ष लागून राहिल आहे.