आयपीएलच्या नियमात होणार बदल

आयपीएलच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये आता प्रत्येक स्थानिक क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. स्थानिक क्रिकेटपटूंवर गेल्या पाच सीझनमध्ये बोली लावण्यात आलेली नव्हती.

Updated: May 29, 2012, 09:57 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

आयपीएलच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये आता प्रत्येक स्थानिक क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. स्थानिक क्रिकेटपटूंवर गेल्या पाच सीझनमध्ये बोली लावण्यात आलेली नव्हती.

 

 

आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये  पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष इजाज बट्ट यांनी ही माहिती दिली. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला आणि आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतरच ही चर्चा अधिक बळावली आहे.

 

 

शाहरुख खाननं थोडी नरमाईची भूमिका घेतल्यावर आता वानखेडेवर त्याच्या बंदीबाबत पुर्नविचार केला जाईल असं एसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी सांगितलं. याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलय.

 

 

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं आयपीएलच्या पाचव्या सीझनवर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सीझनमध्ये गौतम गंभीरची कॅप्टन्सी भलतीच यशस्वी ठरली. त्याची रणनिती फाय़नलमध्येही अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या डावपेचांपेक्षा सरस ठरली.

 

 

कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतांना मनविंदर बिस्लानं धडाकेबाज ८९ रन्सची मॅचविनिंग खेळली. या इनिंगनंतर बिस्लानं टीम इंडियासाठी खेळण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. गेल्या सीझनमध्ये रणजीमध्ये खेळता आलं नसल्यानं त्यानं क्रिकेटला अलविदा करण्य़ाचा निर्णय घेतला होता.

 

ख्रिस गेल आणि मॉर्ने मॉर्केल हे टी-२० महासंग्रामाचे खरे हिरो ठरले. गेलने सर्वाधिक ७३३ रन्स करत ऑरेंज तर मॉर्केलने सर्वाधिक २५ विकेट्स घेत पर्पल कॅपवर कब्जा केला. गेलने नेहमीप्रमाणे सिक्स-फोर्सची बरसात करत क्रिकेट प्रेमींना टी-२०क्रिकेटचा खरा आनंद दिला.