ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सुरवात

सिडनीत भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये पहिल्या टी-२० आज सुरवात झाली. नाणेफेक जिंकून आज प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन धोनीने घेतला. सिडनीतील वातावरण पाहता भारतीय बॉलर्सला वातावरणाचा फायदा मिळावा यासाठी भारताने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

Updated: Feb 1, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

सिडनीत भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये पहिल्या टी-२० आज सुरवात झाली. नाणेफेक जिंकून आज प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन धोनीने घेतला. सिडनीतील वातावरण पाहता भारतीय बॉलर्सला वातावरणाचा फायदा मिळावा यासाठी भारताने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता.  मात्र डेव्हिड वार्नर आणि वाडे यांनी चांगली सुरवात केली.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

मात्र विनयकुमारने डेव्हिड वॉर्नरला सुरेश रैना करवी कॅचआऊट करून त्याचा अडसर दूर केला. वॉर्नरने १४ बॉलमध्ये २१ रन केले त्यात १ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण त्यानंतर आलेल्या ब्रटला सोबत घेऊन वाडे यांने धडाकेबाज फटकेबाजी केली. पण ब्रट १७ रन्सवर असताना राहुल शर्माने त्यांचा बळी घेतला. वाडे मात्र अजूनही चांगली बॅटींग करत आहे. त्याने ३६ बॉलमध्ये आपले अर्धशतक झळकावले आहे. त्यात ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश आहे.

 

दहा ओव्हर नतंर ऑस्ट्रेलियाने ८० रन पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारण्याचा दृष्टीने प्रयत्न करेल. तर मात्र भारतीय बॉलर्सला त्यांना कमीत कमी रनमध्ये रोखणाचं आव्हान असणार आहे.

 

ऑस्ट्रेलिया :  105/2 

इंडिया : ओव्हर (13.0)