बॉक्सिंग टेस्टमध्ये दडलयं काय?

बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये ३३३ रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये झहीर खानची बॉलिंग चांगलीच चालली. त्यानं सुरुवातीलाच कांगारुंना दोन धक्के दिले. त्यानं ब्रॅड हॅडिनला २७ रन्सवर आणि पीटर सीडलला ४१ रन्सवर आऊट केले.

Updated: Dec 27, 2011, 05:57 PM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये ३३३ रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये झहीर खानची बॉलिंग चांगलीच चालली. त्यानं सुरुवातीलाच कांगारुंना दोन धक्के दिले. त्यानं ब्रॅड हॅडिनला २७ रन्सवर आणि पीटर सीडलला ४१ रन्सवर आऊट केले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ७२ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. कांगारुंच्या इनिंगमध्ये हीच पार्टनरशिप निर्णायक ठरली.

 

या दोघांनी ऑस्ट्रेलियाला २९१ रन्सपर्यंत मजल मारुन दिली.  त्यानंतर आर. अश्विननं हिलफेनहॉसला १९ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. नॅथन लिओनला सहा रन्सवर आऊट करत अश्विननं कांगारुंना ३३३ रन्सवर ऑलआऊट केलं. भारताकडून झहीर खाननं ४ विकेट, उमेश यादव आणि आर. अश्विननं प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाने बॉक्सिंग-डेच्या दुसऱ्या दिवसअखेर ३ विकेट्स गमावून २१४ रन्सपर्यंत मजल मारली आहे. राहुल द्रविड ६८ रन्सवर आणि नाईट वॉचमन ईशांत शर्मा शून्यावर नॉटआऊट आहे.

 

भारतीय टीम अजूनही कांगारुंच्या ११९ रन्स पिछाडीवर आहे. कांगारुंना ३३३ रन्सवर ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियाची सुरुवातही अडखळत झाली. गौतम गंभीर अवघ्या तीन रन्सवर आऊट झाला. मात्र, त्यानंतर सेहवागनं आपल्या बॅटचा तडाखा ऑस्ट्रेलियन टीमला दिला. त्यानं ६७ रन्सची शानदार इनिंग खेळली. सेहवाग आऊट झाल्यावर द्रविड आणि सचिन तेंडुलकरची जोडी चांगलीच जमली. सचिन-द्रविड दुसरा दिवस खेळून काढतील अस वाटतं होतं. मात्र, सचिन तेंडुलकर ७३ रन्सवर आऊट झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. सचिन आऊट झाल्यानं त्याची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली. आता, टेस्टच्या तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्यासाठी भारतीय टीम प्रयत्न करेल.