www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय. सिनेक्षेत्रातल्या या सर्वोच्च पुरस्कारानं गुलजार यांचा गौरव करण्यात आलाय. संवेदनशील आणि तरल कवी अशी ओळख असणा-या गुलजारांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
गुलजार यांनी आनंद, ओंकारा, खामोशी, गुड्डी, नमकहराम अशा अनेक चित्रपटांसाठी गीत लेखन केलंय. बंदिनी सिनेमासाठी `मोरा अंग अंग लैले, मुझे श्यामरंग` दै दे या गाण्यापासून त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. तिथपासून ते आजच्या अनेक आघाडीच्या सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखन केलंय.
Bahut acha lag raha hai: Gulzar on being chosen for Dadasaheb Phalke Award pic.twitter.com/ao2pstAdQA
— ANI (@ANI_news) April 12, 2014
याआधी गायीका आशा भोसले, श्याम बेनेगल, मन्ना डे, प्राण, नौशाद, सत्यजित रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गुलजार यांनी आजपर्यंत हिंदी चित्रपटांसाठी अनेक अजरामर गाणी लिहिली आहेत. एक संवेदनशील कवी म्हणून गुलजार यांची हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख आहे.
यापूर्वी गुलजार यांना १९७७, १९७९, १९८०, १९८३, १९८८, १९८८, १९९१, १९९८, २००२, २००५ मध्ये सर्वश्रेष्ठ गीतकाराच्या फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २००४ गुलजार यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.