मुंबई : कर्ज घेणे हे आता गरज झाली आहे. आज अनेक वस्तूसांठी देखील सहज कर्ज उपलब्ध होते. आज घर, गाडी पासून मोबाईलसाठी देखील कर्ज उपलब्ध झाले आहेत.
कर्ज घेतल्यानंतर माणून जरा तणावाखालीच राहतो. कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा देखील कधी कधी तणावाखाली येतो कारण त्याने दिलेले कर्ज पुन्हा त्याला मिळणार का याची चिंता त्याला असते.
ज्योतिष शास्त्रानुसार बुध हा व्यापाऱ्यासाठी उपयुक्त ग्रह मानला जातो. मात्र बुध हा नपुंसक ग्रह म्हणूनही ओळखला जातो. यामुळे शास्त्रानुसार बुधवारी कर्ज देणे चुकीचे मानले गेले आहे. या दिवशी दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता देखील खूप कमी असते.
बुधवारी कर्ज घेतल्यानंतरही त्याची परतफेड करणे अवघड होऊन बसते. बुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता अधिक असून, व्यापारातही संबंधित व्यक्ती अडचणीत येण्याची भीती असते. यामुळेच ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी कर्ज देणे किंवा घेणे चुकीचे मानले जाते.