मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या दिवसापासून त्या व्यक्तीची वर्षभराची कुंडली बनते. या दिवशी आनंदी राहिल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाते. अनेकदा या दिवशी आपण अशी कामे करतो ज्यामुळे ग्रह अनुकूल होत नाहीत आणि संपूर्ण वर्ष खराब जाते. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे वाईट प्रभाव आपल्या जीवनावर होईल.
जन्मदिनी चुकूनही केस अथवा नखे कधीही कापू नका.
या दिवशी मासांहर शक्यतो टाळा. शाकाहारी खाण्याला प्राधान्य द्या.
घरी कोणी भिकारी अथवा गरजू व्यक्ती आल्यास त्याला रिक्त हस्ते माघारी धाडू नका.
बर्थडेच्या दिवशी दारु प्यायल्यास शनी देव अप्रसन्न होतात. त्यामुळे साडेसाती मागे लागण्याची शक्यता असते.
शास्त्रानुसार या दिवशी गंगाजल पाण्यात टाकून स्नान केल्यास उत्तम
बर्थडेच्या दिवशी आई-वडिल आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यास विसरु नका.