खेळणार सच्चू, सेहवागला डच्चू!
आशिया कपसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळणार असून ऑस्ट्रेलियात खराब फॉर्मने झगडत असलेल्या वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
सचिन, सेहवागला आशिया कपमधून डच्चू?
परदेशी जमिनीवर टीम इंडियाची खराब कामगिरी आणि संघातील कुरबुरींच्या बातम्यांमुळे बीसीसीआय कडक पाऊले उचलण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना भारतीय संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सचिनच्या मार्गात मुद्दाम नाही आलो- ब्रेट ली
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीकेची झोड उठविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट लीने याबाबत खुलासा केला आहे. काल झालेल्या सामन्यात मी सचिन तेंडुलकर रन आऊट झाला. त्यावेळी त्याला जाणूनबुजून अडविले नसल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे.
सचिन तेंडुलकरला पर्याय नाही- वेंगसरकर
सचिन तेंडुलकर याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी या कपिल देव यांच्या विधानाचा भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वेंगसरकर म्हणाले की सचिनसारख्या चँपियन खेळाडूला या बाबतीत कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.
'गंभीर' सवाल, सचिनला किती संधी देणार?
शंभराव्या शतकासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला आणखी किती संधी देणार, असा सवाल टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू गौतम गंभीरने विचारला आहे.
आलं धनुषचं नवं 'सचिन साँग' !
सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूषखबर ! 'कोलावरी डी' गाण्यानंतर समस्त तरुणाईचा ताईत बनलेला धनुष याचं नवं सचिन तेंडुलकर गीत प्रसिद्ध झालं आहे. तामिळ स्टार धनुषने क्रिकेटच्या देवावर रचलेलं गीत यूट्युबवर पाहायला मिळेल.
महाशतक हुकलं तरी सचिन ग्रेटच- स्टीव्ह वॉ
सचिन तेंडुलकर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं १००वं महाशतक झळकावू शकला नाही, तरीही बॅट्समन म्हणून तो सर्वश्रेष्ठच राहाणार. असे उद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह वॉ याने काढले आहेत.
इंडियाची हाराकिरी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.
अण्णा हजारे सचिनपेक्षा जास्त विश्वसनीय...
देशातली प्रमुख व्यक्तिमत्व ब्रँड आहेत असं गृहित धरून त्यांना विश्वासार्हतेच्या निकषावर तपासलं तर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथम स्थान प्राप्त करतात.
सचिनच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन - लारा
सचिन हाच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे आणि त्याच्या सारखा उत्तम क्रिकेटर या पिढीत तरी नाही अशी ग्वाही स्वत: एकेकाळचा सर्वोत्तम ब्रायन लारानं दिली आहे.
सचिनने मनोचिकित्सकाकडे जावे- लतिफ
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपल्या महाशतकाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे त्याच्यावर मानसिक दडपण निर्माण होत आहे, त्यामुळे त्याने मनोचिकित्सकाकडून सल्ला घ्यावा, असा फुकटचा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ याने दिला आहे.
टीम इंडियाचे सिडनीतही लोटांगण
मेलबर्ननंतर सिडनीतही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. सिडनीमध्येही धोनी एँण्ड कंपनीच्या खराब कामगिरीची मालिका कायम राहिली.
टीम इंडियाची आगेकूच, सचिनकडे लक्ष
गंभीरची विकेट गेल्यानंतर सचिन तेंडुलकर (७५ रन्स) आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (५८ रन्स) या जोडीने नेटाने किल्ला लढवला आहे. आता सचिनच्या महाशतकाकडे लक्ष लागले आहे.
कोहली आऊट, टीम इंडिया ढेपाळली
दुस-या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नांगी टाकली आहे. सचिन बाद झाल्यानंतर सेट झालेला लक्ष्मण आऊट झाला. त्यानंतर आलेला विराट कोहलीनेही निराशा केली. तो ९ रन्सवर आऊट झाला.
दिल्लीचीही शान राखतो, 'सचिन' आमुचा!
राजधानी दिल्ली तुम्ही लवकरच सचिन तेंडुलकर चौकाला भेट द्याल किंवा सचिन तेंडुलकर मार्गावरून आपली गाडी भरधाव घेऊन जाऊ शकतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दिल्ली महानगरपालिकेने या विक्रमवीराचे नाव एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला देण्याचे ठरवले आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियाचा सचिन विरोधात कट!
ऑस्ट्रेलियन मीडियाने आत सचिन विरोधात माइंड गेम खेळायला सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियातला प्रमुख वृत्तपत्र ‘हेरॉल्ड सन’नं मंकीगेट प्रकरणात सचिन खोटं बोलला होता असा आरोप पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टरला टार्गेट केले आहे.
मास्टर ब्लास्टरचा अनोखा विक्रम
सचिन तेंडुलकरने ड्रीम हाऊसमध्ये गृह प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या बांद्राच्या घराचा विमा उतरवला आहे. आणि विम्याची रक्कम आहे तब्बल १०० कोटी रुपये. आजवर सर्वाधिक विमा उतरवण्याचा विक्रम या विक्रमवीराने केला आहे. सचिनने जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या गटाकडून हा विमा उतरवला असल्याचं उद्योगातल्या सूत्रांनी सांगितलं.
सचिन तेंडुलकर आऊट
झी २४ तास वेब टीम, मेलबर्न बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये आज सचिन तेंडुलकर ३२ रन्सवर आऊट झाला. सिडलच्या बॉलिंगवर हसीने झेल टिपत सचिनची विकेट घेतली. विराट कोहली एकही धाव न घेता हिलफेनहॉसच्या बॉलींगवर पायचित झाला. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण १ रन करून तंबूत परतला होता.
पुन्हा एकदा निराशा, सचिन ७३वर बाद
झी २४ तास वेब टीम, मेलबर्न महाशतकाने पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांची निराशा केली. सचिन तेंडुलकर ७३ रन्सवर आऊट झाला. सिडलने सचिनला क्लीन बोल्ड केलं. सचिनने ९८ बॉल्समध्ये ७३ रन्स केल्या होत्या. महाशतकाच्या जवळ पोहोचून पुन्हा एकदा सचिनला शतकापासून वंचित राहावं लागलं. द्रविड मात्र अजूनही मैदानावर टिकून आहे. द्रविडचंही अर्धशतक पूर्ण झालं आहे.
सेहवाग बाद, सचिन मैदानात
पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं आहे. त्यामुळे द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला आहे. द्रविडच्या २५ रन्स झालेल्या आहेत.