सचिनच्या निवृत्तीनंतर त्याचे रेकॉर्डस् तोडण्याची जॅकला संधी...

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिसन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज झालाय. नुकत्याच निवृत्ती जाहीर केलेल्या सचिनचे विक्रम जॅक तोडू शकेल का? ही उत्सुकता आता जॅक आणि सचिनच्या चाहत्यांना लागलीय.

Dec 2, 2013, 03:33 PM IST

सचिन जगातला सर्वोत्तम खेळाडू – जयसूर्या

आतापर्यंत आपण पाहिलेल्या खेळाडूंपैकी सचिन तेंडुलकर हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचं मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यान व्यक्त केलंय.

Dec 1, 2013, 04:59 PM IST

सचिन तेंडुलकर युनिसेफचा ब्रँड अॅम्बेसिडर, देणार स्वच्छतेचे धडे

मास्टर-ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर युनिसेफचा ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे. आता सचिन आरोग्याविष्यी जनजागृती करणार आहे. मास्टर-ब्लास्टर आता आरोग्याविषयीचे धडे देण्याचं काम कऱणार आहे.

Nov 29, 2013, 07:43 AM IST

सचिनसाठी आयुष्यातलं सर्वात `स्पेशल गिफ्ट` कोणतं? पाहा...

क्रिकेटमधून नवृत्ती घेतलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मोहम्मद अलीचे बॉक्सिंग ग्लोव्ह्ज आणि सर डॉन ब्रॅडमन यांनी स्वाक्षरी केलेली बॅट हे आपल्यासाठी खास असल्याचं मत व्यक्क केलंय.

Nov 28, 2013, 09:09 PM IST

तालिबानचा इशारा, सचिन तेंडुलकरचे कौतुक पुरे, नाहीतर...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० कसोटी सामने खेळल्यानंतर निवृत्त झाला. सचिनने २४ वर्षे क्रिकेटची सेवा केल्याने जगात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर अधिकच कौतुकाची भर पडत आहे. सचिनचे कौतुक करण्यात पाकिस्तान मीडिया मागे नाही. मात्र, हे कौतुक तालिबानला खुपले आहे. आता सचिनचे कौतुक नको. तो भारतीय आहे. नाहीतर तुम्हाला टार्गेट करू, अशी धमकी तालिबान्यांनी दिली आहे.

Nov 28, 2013, 07:41 AM IST

... आणि शोएब सचिनला घाबरला!

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.

Nov 24, 2013, 06:19 PM IST

'दोस्त दोस्त ना रहा'; विनोदचा सचिनवर इमोशनल अत्याचार

‘सचिनला माझ्याविरूद्ध काही लोक भडकवत होते… यात त्यांना यश मिळाल्याचं सध्या दिसतंय’ असं खुद्द सचिनचा एकेकाळचा मित्र विनोद कांबळीने म्हटलंय.

Nov 20, 2013, 07:32 PM IST

पृथ्वी शॉची रेकॉर्डब्रेक कामगिरी, एका इनिंगमध्ये ५४६ रन्स!

स्प्रिंगफिल्ड विरुद्ध सेंट फ्रान्सिसि डी अॅसिसि या हॅरिस शिल्डच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉ नावाच्या युवा क्रिकेटपटूनं चांगलंच धुमशान घातलं. आपल्या शानदार बॅटिंगच्या जोरावर त्यानं हॅरिस शिल्डमध्ये पृथ्वी शॉनं ५४६ रन्स करत ऐतिहासिक कामगिरी केली.

Nov 20, 2013, 02:50 PM IST

क्रिकेटच्या देवाचं बिहारमध्ये होणार मंदिर!

सचिन तेंडुलकर आता नावाचाच देव राहिला नाही तर खरोखरच त्याचं आता मंदिर होतंय. बिहारमध्ये सचिनच्या सन्मानार्थ चक्क मंदिर उभारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर मंदिराचा पायाही आज रचला जाणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही आजच होणार आहे.

Nov 20, 2013, 08:28 AM IST

‘क्रिकेटरत्ना’ला भारतरत्न देण्यावर आक्षेप; याचिका दाखल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालीय.

Nov 19, 2013, 08:37 PM IST

सचिन तेंडुलकर आता पाठ्यपुस्तकात

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर आता लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये पदार्पण करणार आहे. शालेय अभ्यासक्रमात सचिनच्या धड्याचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिली.

Nov 19, 2013, 11:39 AM IST

... आणि सचिन बालमित्राला विसरला?

निवृत्तीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी दिली. या पार्टीला क्रिकेट विश्व, बॉलिवूड आणि राजकारणातले अनेक दिग्गज हजर होते. मात्र या पार्टीत नव्हता तो सचिनचा बालमित्र... सचिननं त्याला आमंत्रणच दिलं नव्हतं... हा मित्र म्हणजे विनोद कांबळी...

Nov 19, 2013, 10:50 AM IST

सचिन तेंडुलकरच्या पार्टीला कोण कोण आलं?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त झाला. त्याला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. त्यानंतर सचिनने सर्वांचे आभार मानले. तर पुरस्कार मिळाल्यानंतर देशातील सर्व मातांचे आभार मानून त्यांच्यासाठी पुरस्कार समर्पित केला. याच सचिनने खास पार्टी आयोजित केली. या पार्टीत कोण कोण आलेत? बॉलिवूड स्टारपासून ते राजकारण्यांपासून अनेक दिग्गजांनी आवर्जुन उपस्थिती लावली.

Nov 19, 2013, 10:00 AM IST

निवृत्तीनंतर काय आहे सचिनचा प्लान?

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकर आता निवांत आहे. आपल्या मुलांना आणि कुटुंबाला दिलेल्या शब्दानुसार सचिननं आता त्यांना वेळ द्यायचं ठरवलंय. त्यासाठी तो लवकरच भारताबाहेर फिरायला जाणार आहे.

Nov 18, 2013, 04:07 PM IST

वाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.

Nov 18, 2013, 04:00 PM IST

सचिन तेंडुलकर फुकटात क्रिकेट खेळलेला नाही - तिवारी

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला... परंतु या पुरस्कारावर जेडीयूनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत.

Nov 18, 2013, 01:46 PM IST

सचिन बोलला 'कुठं ना कुठं क्रिकेट खेळतच राहणार'

भारतरत्न सचिन तेंडुलकरनं आज निवृत्त झाल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सचिन मोकळेपणानं उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेतल्या भारतीय पत्रकारांसोबतच जगातले पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलतांना काही दिवस आपण आराम करणार असून आपण आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रिकेट खेळतच राहणार असल्याचं म्हटलं.

Nov 17, 2013, 05:41 PM IST

... आणि क्रिकेटच्या देवासाठी पंतप्रधानही थांबले!

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सचिन तेंडुलकरला त्याला जाहीर झालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराबाबत फोनवरून शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी थोडा वेगळा प्रकार घडला.

Nov 16, 2013, 10:08 PM IST

सचिन रिटायर्ड होतांना...

सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आज मैदानावर शांत झालं. सचिन आऊट झाला आणि आख्खं वानखेडे स्तब्ध झालं. मुंबई क्षणभरासाठी थबकली आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या आणि सर्वसामान्याच्या मनात गलबललं. लोकलमध्ये, ऑफिसात, टीव्हीच्या दुकानांबाहेर गर्दी करुन मॅच बघणाऱ्या, मोबाईलवर स्कोअर जाणून घेणाऱ्या, टॅक्सीत एफएमवर रेडिओवर स्कोअर ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात चर्र झालं.. काहींच्या प्रतिक्रियेतून ते आलं, तर काहींचे डोळे पाणावले.. त्या धूसर दृष्टीतून मैदानातून बाहेर पडणाऱ्या सचिनला निरोप देताना प्रत्येकाच्या जीवावर येत होते... मैदानातून पॅव्हेलियनकडे परतणारा हा आपला सचिन पुन्हा मैदानावर दिसणार नाही.. सच्चिन

Nov 16, 2013, 07:52 PM IST

सचिन तेंडुलकरला `भारतरत्न` जाहीर!

सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर आता ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर’ होतोय. सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालाय. देशाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारा सचिन पहिला खेळाडू ठरलाय. सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणं ही खुद्द सचिन तेंडुलकर प्रमाणंच त्याच्या चाहत्यांसाठीही एक सरप्राईज गिफ्ट असल्याचं मानलं जातंय.

Nov 16, 2013, 04:21 PM IST