ऍडलेड :बिग बॅश म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या टी-20 टुर्नामेंटच्या फायनलमध्ये सिडनी थंडरनं धडक मारलीये. उस्मान ख्वाजानं झळकावलेल्या सेंच्युरीच्या जोरावर सिडनी थंडरनं ऍडलेड स्ट्रायकर्सचा ८ विकेट्सनं दणदणीत पराभव केला.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऍडलेडला 20 ओव्हर्समध्ये 159 रन्सपर्यंत मजल मारता आली.
त्यानंतर सिडनीकडून बॅटिंगला आलेल्या उस्मान ख्वाजानं 59 बॉलमध्ये 104 रन्सची अफलातून खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 13 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. बिग बॅश लिगमधली उस्मान ख्वाजाची ही दुसरी सेंच्युरी आहे.