भारतातली टॉप २० इंजीनिअरींग कॉलेजेस

चांगल्यात चांगले शिक्षणतज्ञ, उत्तम शिक्षण, माजी विद्यार्थी, सध्या शिकत असणारे विद्यार्थी आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या सर्वांशी चर्चा करून त्यांच्या सहभागातून झी नियूजने हे जागतिक दर्जाचं सर्वेक्षण केलं आहे.

Updated: Jan 19, 2012, 05:02 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

चांगल्यात चांगले शिक्षणतज्ञ, उत्तम शिक्षण, माजी विद्यार्थी, सध्या शिकत असणारे विद्यार्थी आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या सर्वांशी चर्चा करून त्यांच्या सहभागातून झी नियूजने हे जागतिक दर्जाचं सर्वेक्षण केलं आहे.

 

 

 

 

 

1) आयआयटी- कानपूर

2) आयआयटी- मुंबई

3) आयआयटी- दिल्ली

4) आयआयटी- खरगपूर

5) आयआयटी- मद्रास

6) आयआयटी- रुरकी

7) आयआयटी- गुवाहाची

8) एनआयटी- वारंगळ
9)एसआरएम इंजीनिअरींग कॉलेज, चेन्नई
10) एमएन-एनआयटी, अहमदाबाद

11) इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बनारस हिंदू विद्यापीठ

12) विश्वेश्वरय्या टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगाव

13) कॉलेज ऑफ इंजीनिअरींग, पुणे

14) आयआयटी- हैद्राबाद

15) दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरींग

16) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी

17) धिरुभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजी, गांधीनगर

17) मणीपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मणीपाल

18) एनआयटी, त्रिची

19) पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी, कोईम्बतुर

20) आयएसएम, धनबाद

झी न्यूजने जागतिक दर्जाच्या तिसऱ्या मानल्या जाणाऱ्या आयपीएसओबरोबर देशातल्या उच्च शिक्षण देणऱ्या सर्वोत्तम कॉलेजेसचं सर्वेक्षण केलं. यात टॉपची ३ कॉलेजेस आयआयटीचीच आहेत.

 

आयआयटी- कानपूर ही संस्था उच्च शिक्षण, संशोधन, सायंस आणि टेक्नोलॉजीसाठी जगद्विख्यात आहेच. पण, इंजीनिअरींग कॉलेज म्हणूनही ते आपला सर्वोत्तम असण्याचा ठसा निर्माण करू लागलं आहे.

 

आयआयटी- कानपूरचं वर्चस्व वादातीत असून एसआरएम इंजीनिअरींग कॉलेज, चेन्नई हे खाजगी संस्थांमधील सर्वोत्तम मानली गेली आहे. याचबरोबर काही नव्या इन्स्टिट्यूट्यचाही सर्वोत्तम २० मध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

 

आयआयटी खरगपूर हे भारतातलं सर्वोत्तम इंजीनिअरींग कॉलेज आमच्या सर्वेक्षणात चौथ्या क्रमांकावर आहे. आयआयटीव्यतिरीक्त एसआरएम इंजीनिअरींग कॉलेज हे टॉपच्या कॉलेजेसमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालं आहे. ऍना युनिव्हर्सिटीचं सदस्यत्व घेतलेलं हे कॉलेज २००६ पासून स्वतंत्रपणे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी म्हणून कार्यरत आहे.