www.24taas.com, मुंबई
नाव - सुनीता पांड्या - विल्यम्स
वय - ४३ वर्ष
घर - ४७० किलोमीटर उंचीवर तयार केलेलं स्पेस स्टेशन.
'सुनीता विल्यम्स' हे नाव जगभरात आता गाजतय मूळ भारतीय असेलल्या सुनिताचा तर भारताला मोठा अभिमान आहे. मात्र जगभरातल्या अब्जावधी लोकांमधुन पुन्हा सुनिताचीच का झाली निवड ? सुनिता विल्यम्सच्या खडतर आणि आव्हानात्मक प्रवासावर टाकूयात एक नजर..
19 सप्टेंबर 1965 ला मूळ भारतीय वंशाचे न्यूरोएनोटॉमिस्ट दिपक पंड्या यांच्या घरी जन्मलेली सुनीताआधी पासूनच काहिशी वेगळी होती. शाळेत ती कठीणात कठीण फॉर्मुले चटकन सोडवत असे. सुनिताने संयुक्त राष्ट्र नौसेना एकॅडमीतून फिजिक्सची पदवी घेतली आणि नंतर फ्लोरीडातून इंजिनियरींग मॅनेजमेंटची...
1987 ला सुनिता नौसेनेत दाखल झाली. तिथं तिला डायविंग ऑफीसरचा दर्जा देण्यात आला आणि नंतर तिची नियुक्ती नौसेना एअरविंग कमांडमध्ये करण्यात आली. अमेरिकेच्या फायटर हेलिकॉप्टरमध्ये तिची काही काळ नियुक्ती होती. आखाती युध्दादरम्यान सुनीताची अनेक महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती.
सुनिता विल्यम्सने प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिध्द केलं. इतकंच नाही तर इतरांपेक्षा कैक पटीने सरस असल्याचे तिने दाखवून दिलं. आणि त्याचमुळे तिला हेलिकॉप्टचे टेस्ट पायलट बनवण्यात आलं. सुनीताने अमेरिकन नौसेनेसाठी रोटरी विंग एअरक्राफ्ट टेस्टिंग अंतर्गत अनेक हेलिकॉप्टर्सच्या यशस्वी चाचण्या केल्या. सगळ्यात अत्याधुनिक आणि सर्वोत्तम हेलिकॉप्टर अपाची आणि युएच-60 च्याही चाचण्या तिनं केल्या. 3 हजार तासाहूनही अधिक काळ तिनं हेलिकॉप्टर आणि विमान उडवली आणि ती ही कुठलीही चूक न करता आणि म्हणुनच तिच्या या सुंवर्ण कारकिर्दी कडे पाहूनच तिची फ्लाईट इंजिनियर म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
1998 मध्ये नासात दाखल
1998 साली नासात दाखल होताच सुनितानं तिथलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण तर केलंच शिवाय या सगळ्या तांत्रिक बाबीतही ती अव्वल ठरली.
प्रोजेक्ट NEEMO मध्ये ही सुनीताचा सहभाग
समुद्रातल्या सगळ्यात खोल भागात सुनीतानं जास्तीत जास्त दबाव सहन करण्याचं ट्रेनिंग घेतलं. या प्रशिक्षणातही ती पुरूषांपेक्षा अव्वल ठरली ..आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसी सुनीताने स्पेस शटल डिस्कवरीतून अंतराळात पहिली भारारी घेतली.
9 डिसेंबर 2006 सुनीताचं पहिलं उड्डाण
सुनितानं अंतराळातल्या स्पेस स्टेशनमध्ये अनेक महत्वाचे प्रयोग केले ज्यात विद्यार्थ्यांना प्रचंड फायदेशीर ठरलेली दोन रेडीओ सिग्नल यंत्रणेचाही समावेश आहे.सुनीता 195 दिवस अंतराळात राहिली आणि परत आल्यानंतर तिने सगळ्या जगाला विशेषतः भारतीयांना आपल्या अंतराळातील विविध शोध आणि प्रयोगा