www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात चोरीच्या घटना वाढतायत. त्यातच शुक्रवारी पहाटे ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीच्या घटनेमुळं पोलिसांपुढे नवं आव्हान उभं ठाकलंय.एक हा रिपोर्ट.
चोरी करण्यासाठी नवनवे फंडे शोधणारे चोरही आता हायटेक होऊ लागलेत.. त्याचाच हा एक नमुना पहा.. ठाण्यातल्या समता नगरमधलं हे राज गोल्ड ज्वेलर्स. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरांनी 28 लाखांचे सोनं इथून लंपास केलं. विशेष म्हणजे चोरीचा हा कारनामा तिस-या डोळ्यात अर्थात सीसीटीव्ही कॅमे-यात कैद होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तोडला.
इतकंच नाहीतर कॅमे-याची हार्डडिस्कही या चोरांनी लांबवली. दुकानात सोन्याच्या दागिन्यांसह इमिटेशन ज्वेलरीसुद्धा होती. मात्र चोरट्यांनी फक्त सोन्याचे दागिने चोरले. त्यामुळं हा प्रकार ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.
प्रत्येक दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमे-याच्या हार्ड डिस्कमध्ये सेव झालेली दृष्यं संग्रहित करुन किंवा त्याचा बॅकअप घ्यावा असं आवाहन पोलिसांनी केलंय. गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा म्हणून तिस-या डोळ्याकडे पाहिलं जात होतं. मात्र आता चोरही या टेक्नॉलॉजीवर मात करु लागल्यानं पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.