www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन कोडाईकनालहून मदुराईला रवाना झालाय. मदुराईहून चार्टड विमानानं मय्यपन मुंबईत दाखल होणार आहे. संध्याकाळी चार वाजेपर्यंत ते मुंबई पोहचण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मय्यपन यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते.
मयप्पनही बेटिंग करत असल्यचं विंदूच्या चौकशी दरम्यान उघड झालंय. विंदू बेटिंग करताना एक कॉल बुकी रमेश व्यासला करायचा तर लगेच दुसरा कॉल मयप्पनला करायचा. मयप्पन-विंदू दारासिंगचं कसं जुळलं होतं कनेक्शन.... पाहुयात...
गुरुनाथ मयप्पन... बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनीवासन यांचे जावई... बॉलिवूड कलाकार विंदू दारासिंग याला पोलिसांनी फिक्सिंग प्रकरणी अटक केल्यावर त्याने गुरुनाथ मयप्पनशी आपले संबंध असल्याच सांगितलं आणि तिथूनच या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाला नवं वळण लागलं. मयप्पन केवळ बीसीसीआयच्या अध्यक्षांचा जावईच नाही तर चेन्नई सुपर किंग्जचा सीईओदेखील आहे. यामुळेच बीसीसीआय अध्यक्षांच्या अडचणी वाढल्यात.
आयपीएलनंतरच्या होणाऱ्या पार्ट्यांमध्ये विंदू आणि मयप्पनची ओळख झाली. यानंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली. गेल्या चार-पाच वर्षांपासून या दोघांमध्ये मैत्री असून ते अनेकदा फोनवरुन एकमेकांशी संपर्क साधत असत. मयप्पनमुळेच विंदू दारासिंगला स्टेडियममध्ये व्हीआयपी पास मिळत असत. दोघांमधील संभाषणाचे रकॉर्ड पोलिसांकडे आहेत.
विंदूला अटक झाल्यानंतर मयप्पनचं नाव पुढे आल्यानंच मुंबई पोलिसांनी चेन्नईत जाऊन गुरुनाथ मयप्पनला समन्स बजावला आणि त्याला शुक्रवारी पाच वाजेपर्यंत मुंबई पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे. आतापर्यंत क्रिकेटर, बुकी, बॉलिवूड स्टार्सलाच स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक झालीय. मात्र, याप्रकऱणात मयप्पनला अटक झाली तर तो पहिला आयपीएल फ्रेन्चायझीचा मालक असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.