www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
काँग्रेसने लोकसभेसाठी अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
आदर्श घोटाळ्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. मात्र अशोक चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट दिल्यानंतर, काँग्रेस आदर्श प्रकरण विसरलं का?, असा सवाल विचारला जातोय.
आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती, यानंतर अशोक चव्हाण राजकीय विजनवासात गेले होते.
मात्र औरंगाबादच्या राहुल गांधींच्या सभेत अचानक व्यासपिठावर अशोक चव्हाण चमकले होते. अशोक चव्हाण राहुल गांधी यांच्या व्यासपिठावर दिसल्यानंतर, अशोक चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
काही दिवसांपासून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण नांदेडची जागा काँग्रेसकडून लढवणार असल्याची चर्चा होती.
मात्र अशोक चव्हाण यांना काँग्रेसने तिकीट जाहीर केल्यानंतर, या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी काँग्रेस आदर्श प्रकरण विसरलं का?, या चर्चा सुरू झाली आहे.
पाहा व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.