www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळावर अखेर पडदा पडलाय. आज सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल के. शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री राजभवन इथं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शपथविधी समारंभ आयोजित करण्याबाबत पत्र सादर केलं. त्यामुळं काँग्रेसचा मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ संपलाय, असं असलं तरी तिसऱ्या मंत्र्याची जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
गेल्या 2-3 दिवसांपासून काँग्रेसमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन चांगला गोंधळ सुरु होता. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश काही नावांवर अडून बसल्याची चर्चा होती. मोहन प्रकाश यांनी दिलेल्या नावावर एकमत होत नसल्यानं विस्तार रखडला होता. तसंच काँग्रेसमधील नाराजी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.