www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, गांधीनगरमधून ते निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत. ते भोपाळ ईच्छूक असल्याने याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
अडवाणी यांना गुजरातमधील गांधीनगर आणि मध्यप्रदेश मधील भोपाल या दोन्ही मतदारसंघ दिले असून यापैकी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याचा निर्णय अडवाणी घेणार आहेत. गुजरात भाजपाने अडवाणींना गांधीनगरमधून निवडणूक लढवण्याची शिफारस केलीय.
पण अडवाणी स्वत: गांधीनगरमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याचं सूत्रांकडून समजतय. त्याचवेळी मध्यप्रदेशमधील भोपाळमधून अडवाणी निवडणूक लढवू शकतात. भोपाळचे खासदार कैलास जोशी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट करत ही जागा अडवाणींसाठी सोडली आहे. त्याचवेळी नरेंद्र मोदी वडोदरामधून ही निवडणूक लढवण्याची शिफारस करण्यात आल्याचं समजतय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.