www.24taas.com, झी मीडिया, भिवंडी
सकाळी 11.00 वाजता अपडेट
सहाव्या फेरीत भाजपचे कपिल पाटील यांनी आघाडी कायम 19481 मतांनी आघाडी
सकाळी 10.00 वाजता अपडेट
भिवंडी - तिसऱ्या फेरीअखेरीस भाजचे कपिल पाटील ४८८२ मतांनी आघाडीवर
9.09 भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील 10,500 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : भिवंडी
मतदान दिनांक : २४ एप्रिल
एकूण मतदान : 43 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – विश्वनाथ पाटील (काँग्रेस)
महायुती – कपिल पाटील (भाजप)
आप – जलालुद्दीन अन्सारी
मनसे – सुरेश म्हात्रे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
सुरेश टावरे – काँग्रेस – १,८२,७८९ मतं – ३१.२९%
जगन्नाथ पाटील भाजप – १,४१,४२५ मतं – २४.२१%
देवराज म्हात्रे – मनसे – १,०७,०९० मतं – १८.३३%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,८३,१७६
पुरुष : ८,१९,७२०
महिला : ६,६३,४५६
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भिवंडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला.
गेल्या वेळी विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेसचे सुरेश टावरे यांना झाला आणि ते निवडून आले. खासदार म्हणून फारसा प्रभाव पाडण्यात ते यशस्वी झाले नाहीत.
भिवंडी ते मुरबाडपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रभाव आहे.
काँग्रेसची सारी भिस्त ही भिवंडी शहरातील मुस्लिम मतांवर आहे.
भिवंडीमध्ये समाजवादी पार्टीची चांगली ताकद असली तरी भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केल्याने लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचे विभाजन होणार नाही, असा काँग्रेसला आशावाद आहे. काँग्रेससाठी वाट बिकट असली तरी मोदी घटकामुळे सुमारे चार लाखांच्या आसपास असलेल्या मुस्लिम मतांचे धुव्रीकरण होईल
भाजपची नेमकी उलटी भूमिका आहे. मोदी यांच्यामुळे भिवंडी वगळता बाकी सर्वत्र भाजपलाच मतदान होईल, असे भाजपचे गणित आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.