www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली/चिमूर
संध्याकाळी 6: 36वाजता अपडेट अशोक नेते 2 लाख 36 हजार 540 मतांनी विजयी
सकाळी 3:00 वाजता अपडेट भाजपचे अशोक नेते विजयी
सकाळी 10:00 वाजताअपडेट गडचिरोली-चिमूर - अशोक नेते आघाडीवर
मतदारसंघ : गडचिरोली-चिमूर
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६१ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – नामदेव उसेंडी
महायुती – अशोक नेते (भाजप)
आप – डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
मारोतराव कोवासे - काँग्रेस - 3,21,756 मतं - 38.43%
अशोक नेते – भाजप – 2,93,176 मतं - 35.02%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 12,85,387
पुरुष : 6,51,543
महिला : 6,33,844
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
नक्षलवादाचे रडगाणे गात वाटचाल.
गेल्या वेळी विदर्भात निर्माण झालेल्या अनुकूल फायद्यामुळे कोवासे निवडून आले होते. यंदा मात्र परिस्थिती तेवढी चांगली नाही. काँग्रेसचे स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांची नाराजी कोवासे यांना त्रासदायक ठरू शकते.
गडचिरोली परिसरात राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिताच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली. या साऱ्या बाबी काँग्रेससाठी अडचणी वाढविणाऱ्या आहेत.
मात्र आदिवासींमध्ये काँग्रेसबद्दल असलेली आपुलकी फायदेशीर ठरेल, असे काँग्रेसचे गणित आहे. कोवासे यांच्याबद्दलची नाराजी, पक्षांतर्गत गटबाजी हे सारे आपल्या पथ्थ्यावर पडेल, असे भाजपचे गणित आहे.
विदर्भातून यंदा जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांचा प्रयत्न आहे.
गडचिरोलीसाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची शासनाने केलेली घोषणा सत्ताधारी पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.
मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
हा जिल्हा देशाला भेडसाविणा-या नक्षल समस्येच्या केंद्रस्थानी आहे.
या मतदारसंघात ६० टक्के भूभाग हा वनक्षेत्राखाली आहे त्यातही हे राखीव वन क्षेत्र असल्याने मोठे उद्योग नाहीत त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे.
सोबतच याच वनकायद्यामुळे या भागातील सिंचन प्रकल्प अडले आहेत.
याच मतदारसंघात राष्ट्रीय प्रकल्प घोषित झालेल्या गोसेखुर्द धरणाचा उजवा कालवा जात आहे. या कालव्याचे काम २० वर्षे रखडल्याने शेतकरी संतप्त आहेत.
आदिवासीना नक्षल समस्येपासून दूर ओढून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न नाहीत.
ज्या भागात तुलनेने नक्षल प्रभाव कमी आहे त्या भागात विकासाच्या योजना भ्रष्टाचाराने पोखरल्याचे चित्र आहे.
याशिवाय आदिवासी प्राबल्यामुळे अन्य समाजाकडे विशेषतः OBC प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष धुमसता मुद्दा आहे.
जातीपातीची समीकरणं
या लोकसभा मतदारसंघात ६० टक्के आदिवासी मतदार आहेत. तर साधारण १५ टक्के मतदार OBC आहेत.