www.24taas.com, झी मीडिया, लातूर
दुपारी 02.43 अपडेटलातूर- भाजपचे सुनील गायकवाड 2 लाख 53 हजार 395 मतांनी विजयी
दुपारी २.०० वाजता अपडेट - ६ मतदारसंघांचे निकाल हाती
Ø लातूर - भाजपच्या सुनिल गायकवाड यांचा जवळपास २ लाख ५० हजार मतांनी विजय
दुपारी १२.०० वाजता अपडेट
Ø लातूर - भाजपचे सुनिल गाडकवाड १ लाख ५० हजार मतांनी आघाडीवर
सकाळी १०.४५ वाजता अपडेट
Ø लातूर - नवव्या फेरीअखेर भाजपचे सुनील गायकवाड जवळपास १ लाख मतांनी आघाडीवर
सकाळी १०.१५ वाजता अपडेट
Ø लातूर - सुनिल गायकवाड १७००० मतांनी पुढे
सकाळी ८.१५ वाजता अपडेट
Ø लातूर पत्रकारांना मतमोजणी केंद्रात प्रवेश नाकारल्यामुळे पत्रकारांचे ठिय्या आंदोलन... मतमोजणी केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू
मतदारसंघ : लातूर (एससी)
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ६२ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – दत्तात्रय बनसोडे
महायुती – सुनील गायकवाड (भाजप)
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
जयवंतराव आवळे – काँग्रेस – 3,72,890 - 44.96%
सुनिल गायकवाड - भाजप – 3,64,915 - 44.00%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 15,09,987
पुरुष : 7,92,711
महिला : 7,17,276
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
विलासरावांनी तिरकी चाल खेळत आपल्याला साथ देणा-या कोल्हापूरकर जयवंतराव आवळे यांना आयात करण्यात आले.
जिल्ह्यात खासदाराच्या रूपाने नवे नेतृत्व तयार होणार नाही, अशी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती.
जयवंतराव आवळे हे खासदार म्हणून निवडून आले, पण पाहुण्या कलाकाराप्रमाणाचे त्यांचे वर्तन राहिले. सर्वेसर्वा विलासराव असल्याने जयवंतरावांनी फार काही मनावर घेतले नाही. विलासराव सांगतील तेवढेच बस, बाकी कोल्हापूर बरे, असेच त्यांचे धोरण राहिले.
विलासरावांच्या निधनानंतर लातूरची जागा कायम काँग्रेससमोर आहे. आवळे यांनी मतदारसंघाशी फारसा संपर्कच ठेवला नाही.
लातूरची रेल्वे गाडी नांदेड पर्यंत विस्तारण्यात आले तेव्हा लातूरकरांमध्ये प्रतिक्रिया उमटली. पण ही गाडी नांदेडला नेण्याकरिता लातूरकर खासदार आवळे यांनी पत्र दिल्याचे समजताच सर्वच जण थक्क झाले.
‘पाहुणे कलाकार’ भूमिका पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याने दत्तात्रय बनसोडे यांना ही संधी मिळाली.
अमित देशमुख यांच्यासाठी लातूरची जागा ही प्रतिष्ठेची ठरणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.