www.24taas.com, झी मीडिया, मावळ
दुपारी ४.०० वाजता अपडेट
Ø मावळ श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांजी विजयी... जगताप यांनी ३,५४८२९ मतं, तर नार्वेकरांना १,८२,२९३ मतं
दुपारी २.०० वाजता अपडेट
Ø मावळ - श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी विजयी घोषित
दुपारी १२.०० वाजता अपडेट
Ø मावळ - अनंत बारणे १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर
सकाळी ९.०० वाजता अपडेट
Ø मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर
मतदारसंघ : मावळ
मतदान दिनांक : 17 एप्रिल
एकूण मतदान : ६३.१ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – राहुल सुरेश नार्वेकर
महायुती – श्रीरंग चंदू बारणे (शिवसेना)
आप – मारुती साहेबराव भापकर
अपक्ष - लक्ष्मण जगताप
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
गजानन बाबर - शिवसेना – 3,64,857 मतं - 50.84%
आझम पानसरे – राष्ट्रवादी – 2,84,238 मतं - 39.61
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 16,04,886
पुरुष : 8,50,972
महिला : 7,53,914
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
दोनदा आमदारकी आणि नगरसेवकपद तर एकदा खासदारकी भूषविलेल्या बाबर यांचा अफाट जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.
शिवसेना आणि शेकापची युती असल्याने पनवेल, उरण आणि कर्जत या रायगडमधील तिन्ही मतदारसंघांत त्याचा शिवसेनेला फायदा होतो.
यंदा कोणत्याही परिस्थितीत मावळची जागाजिंकायचीच, असा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.
पुणे जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघांचे पारडे कोणत्या दिशेला जाते यावरच सारे अवलंबून राहणार आहे.
मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
पवना बंद पाईप लाईन योजना
अनधिकृत बांधकाम प्रश्न
रेड झोन मध्ये येणाऱ्या घरांचा प्रश्न
झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न
इंद्रायणी, पवना नदी शुद्धीकरण प्रकल्प प्रश्न
आरोग्य प्रश्न
एल बी टी
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.