www.24taas.com, झी मीडिया, नंदूरबार
दुपारी 01.23 अपडेटनंदुरबार - हीना गावित 1 लाख 19 हजार मतांनी विजयी, हीना गावित यांच्याकडून अखेर माणिकराव गावित यांच्या विजयाची परंपरा खंडीत, हीना गावित यांच्या विरोधात पहिल्यांदाच माणिकराव गावित पराभूत, नंदुरबारच्या आदिवासी पाड्यात पहिल्यांदा कमळ फुललं. स्वातंत्र्यापासून नंदुरबारमध्ये पहिल्यांदा काँग्रेसचा पराभव.
अपडेट 10.03 AM | भाजपच्या हिना गावित आघाडीवर
मतदारसंघ : नंदूरबार
मतदान दिनांक : 24 एप्रिल
एकूण मतदान : 62 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – माणिकराव गावित (काँग्रेस)
महायुती – हिना गावित (भाजप)
आप – विरेंद्र वळवी
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
माणिकराव गावित - काँग्रेस - 2,75,936 मतं - 36.01%
सुहास नटवडकर - भाजप - 1,95,987 मतं - 25.58%
शरद गावित – सपा – 2,35,093 मतं - 30.68%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 14,55,543
पुरुष : 7,26,989
महिला : 7,28,554
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
गावित विरुद्ध गावित : सुडाची लढाई
महाराष्ट्रातील नंदुरबार आणि सांगली या दोनच मतदारसंघांमध्ये राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेस उमेदवाराचा पराभव झालेला नाही.
लागोपाठ नऊ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे माणिकराव गावित हे करीत आहेत.
माणिकदादांविरुद्ध भाजपनं डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांना उमेदवारी दिलीय.
एकूणच नंदुरबारमधील लढाई ही काँग्रेस विरुद्ध विरोधी पक्ष अशी होण्यापेक्षा गावित विरुद्ध गावित अशीच होण्याची चिन्हे आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.