www.24taas.com, झी मीडिया, रामटेक
संध्याकाळी 7:25 वाजताअपडेट शिवसेनेचे कृपाल तुमाने 1 लाख 75 हजार 791 मतांनी विजयी
संध्याकाळी 5 वाजताअपडेट सोळाव्या फेरीनंतर कृपाल तुमाने 1 लाख 45 हजार 108 मतांनी आघाडीवर
संध्याकाळी 4 वाजताअपडेट
आठव्या फेरीनंतर रामटेकचे कृपाल तुमाने 61 हजार मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : रामटेक (एससी)
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ५५.४५ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – मुकुल वासनिक (काँग्रेस)
महायुती – कृपाल तुमाने (शिवसेना)
आप – प्रताप गोस्वामी
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
मुकुल वासनिक – काँग्रेस – २,९४,९१३ मतं – ३८.५७%
कृपाल तुमाने – शिवसेना – ३,११,६१४ मतं – ४०.७५%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,०२,९००
पुरुष : ७,८६,५६४
महिला : ७,१६,३३६
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
वर्षांनुवर्षे दिल्ली दरबारी राजकारण केलेले असल्याने वासनिक यांना दिल्लीचेच जास्त आकर्षण. यातूनच बहुधा त्यांना मतदारसंघात फिरण्यास कमी वेळ मिळाला असावा, अशी टीका केली जाते.
गांधी घराण्याशी असलेल्या जवळिकीमुळे वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आली. देशातील दुर्बल घटकांचा नेता म्हणून स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याची चांगली संधी वासनिक यांना चालून आली होती, पण वासनिक हे दिल्लीतच अडकले.
खात्यावर किंवा मतदारसंघात वासनिक स्वत:चा असा ठसा उमटवू शकले नाहीत. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात वासनिक यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आणि पक्षसंघटनेचे काम सोपविण्यात आले.
निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसे वासनिक यांचे मतदारसंघातील दौरे वाढले.
जातीपातीची समीकरणं
तेली समाजाचे प्राबल्य या मतदार संघात आहे. त्या पाठोपाठ दलित, कुणबी, मुस्लिम आणि आदिवासी मतदार रामटेक मध्ये आहेत.
१५ लाख मतदार असलेल्या रामटेक मध्ये ३.५ लाख तेली, २.५ लाख कुणबी, ३ लाख दलित, १.५ लाख मुस्लिम आणि १ लाख आदिवासी मतदार आहेत
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.