www.24taas.com, झी मीडिया, बेळगाव
नातवासह मतदान केंद्रावर आलेल्या ७५ वर्षीय आजी मतदानासाठी मशीनजवळ गेल्या.पण मतदान मशिनीजवळ अंधार असल्याने आजी म्हणाल्या ‘हितं काय बी दिसत नाय बाळा, हितं मोदीचं बटण कुठं हाय? असा प्रश्न मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना केल्यावर त्यांची तारांबळ उडाली. मोदींचा फिवरची झलक बेळगावात दिसून आली.
काल बेळगावमध्येही लोकसभेतसाठी मतदान झाले. यावेळी तरूणांसह अनेकवर्षांपासून मतदान करणाऱ्या वृद्धांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. बेळगावातील सरदार्स हायस्कूलमधील एका मतदान केंद्रावर एक महिला मतदानासाठी आली. नातवाच्या साथीने आलेल्या आजींनी ओळखपत्र दाखवून अगंठ्याला शाई लावून मतदान करण्यासाठी एका खोलीत पाठविण्यात आले. या खोली अंधार असल्याने त्यांना कुठे मतदान करायचे हे समजत नव्हते. त्यावर आजींनी सांगितलं इथे काही दिसत नाहीत, असे सांगितले. तेथील कानडी कर्मचाऱ्यांना आजीचं बोलणं समजल नाही. मग मागे उभ्या असलेल्या एका मतदानाने कर्मचाऱ्यांना समजवले.
त्यावर कर्मचारी म्हटला निळ्यापैकी एक बटण दाबा त्यावर आजी म्हणाल्या हो रे बाबा पण यातलं मोदीचं बटण कुठे आहे, असं उघडपणे विचारलं त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. मला काय कळत नाही, तूच येऊन दाखव की बाबा. मतदान ही गुप्त पद्धती असल्याने कर्मचाऱ्याला आता काय करावे हे कळत नव्हतं. मग एका मराठी मतदाराने सांगितले अहो त्यांना भाजपला मतदान करायचं आहे. तिला मदत करा. त्यानंतर कर्मचाऱ्याने धाडस करून आजींचा हात धरला आणि पुढील काम केले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.