नवी दिल्ली: थंडीत सुंदर आणि चमकदार त्वचा तसेच केसांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पाच गोष्टी उपयुक्त ठरतील.
1.गाजर : गाजरात ए आणि सी व्हिटामिन्स असतात. सी व्हिटामिन्समुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते तर ए व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास तसेच त्वचेचा रंग निखरण्यास मदत होते.
2.संत्री: संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यामुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो. दररोज संत्र्याचे सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक घटक बाहेर फेकण्यास मदत होते.
3.अॅवाकाडो: अॅवोकाडो शरीरासाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त फळ आहे. या फळात व्हिटामिन ई चे प्रमाण जास्त आहे.
4.मासे: बांगडा, ट्युना, रावस यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. या फॅटी अॅसिडमुळे त्वचेचा दाह कमी होण्यास मदत होते. तसेच जळजळीमुळे त्वचेवर येणारा लालसरपणाही या ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे कमी होतो.