नवी दिल्ली : तुम्ही कौटुंबिक जीवनात आनंदी राहण्यासाठी तुमचे सेक्स लाईफ चांगले असावे लागते. तुमच्यातील सेक्स लाईफ वाढविण्यासाठी जगात अनेक आणि वेगवगळे प्रयोग केले जात आहेत. तसेच अभ्यास करण्यात येत आहे. मात्र, तुम्ही जर हा नैसर्गिक आहार घेतला तर तुमचे सेक्स लाईफ वाढते आणि तुम्ही जोडीदारासोबत आनंदी राहू शकता.
चॉकलेट : चॉकेलट हे चांगल्या सेक्ससाठी ड्राईव्ह मानले जाते. सेक्ससाठी नैसर्गिक एंटीऑक्सीडेंट आहे. चॉकलेटमुळे डोके आणि हृदय यातील रक्त प्रवाहाला उन्नत करते. चॉकलेटमधून फिनालेथाइलेमाईन नावाचा घटक असतो तो खाण्यामुळे मनात सेक्स जागृती होते. तसेच जोडीदाराबाबत प्रेम निर्माण होते. एका अभ्यासानुसार चॉकलेट खाण्यामुळे आपण रोम्याँटीक होतो. डार्क चॉकलेटमुळे रक्तदाबावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि सेक्सची क्षमता वाढते.
संत्रे : संत्र्याला आयुर्वेदात खूप महत्व आहे. संत्र्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुण आहेत. संत्रे खाण्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिरोधक क्षमता वाढीला लागते. संत्रे खाण्यामुळे सेक्स लाईफ चांगले होते. त्यामुळे संत्रे खाण्याबाबत संकोच करु नका. बिनधास्त खा.
शतावरी : शतावरी एक चमत्कारी औषध आहे. अनेक रोगांवर गुणकारी औषध आहे. खासबाब म्हणजे सेक्स शक्ती वाढविण्यास मदत करते. शतावरीचे सेवन केल्यामुळे शुक्रानु वाढतात, शीतल, मधूर तसेच दिव्य रसायन मानले जाते. चिरतरुण यौवन संबंध कायम राहण्यास मदत करते. शरीरात ताकद आणि वीर्य वाढसाठी शतावरी मदत करते.
अंडे : अंड्यामध्ये अनेक पोषख घटक असतात. त्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन बी-५ आणि व्हिटॅमिन बी-६ जास्त प्रमाणात अंड्यात आढळून येते. त्यामुळे तुमचे सेक्स लाईफ चांगले राहते. सेक्समध्ये नवा रोमांच आणण्यात अंड महत्वाची भूमिका निभावते.
टरबूज : टरबूज सेक्स ड्राईव्ह वाढविण्यास मदत करते. सेक्स जीवनात व्हियाग्रा म्हणून टरबूजाकडे पाहिले जाते. त्यामुळे सेक्स लाईफ वाढविण्यासाठी टरबूजचे सेवन चांगले.
केसर : केसर एक खाद्य पदार्थ आहे. याचा वापर केल्यास कामुकता वाढीस लागते. केसर हार्मोन उत्तेजित करण्यास मदत करते. त्यामुळे चांगले सेक्स जीवन जगता येते. केसर दुधात मिसळून घेतल्याने शरीरात काम जीवनाची भावना अधिक जागृत होते.
लसून : सेक्स संबंध सुधारण्यासाठी लसून महत्वाची भूमिका बजावते. लसूनमध्ये कामोत्तेजक गुण अधिक असतात. त्यामुळे रक्त प्रवाह चांगला राहतो. लैंगिक क्षमता वाढीला लागते. मात्र, लसून चांगली असली तरी जास्त प्रमाणात खाऊ नका. सेक्स वाढीला लागण्यासाठी लसून कॅप्सूलचा वापर करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.