आता कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येणार नाहीत

जेवणातील अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा वापर महत्त्वाचा असतो. मात्र हा कांदा खाण्यासाठी जितका चांगला लागतो त्यापेक्षा कठीण असते कांदा कापणे. कांदा कापतान हमखास डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. खाली काही टिप्स दिल्यात ज्यामुळे कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येणार नाहीत.

Updated: Oct 28, 2016, 08:52 PM IST
आता कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येणार नाहीत title=

मुंबई : जेवणातील अनेक पदार्थांमध्ये कांद्याचा वापर महत्त्वाचा असतो. मात्र हा कांदा खाण्यासाठी जितका चांगला लागतो त्यापेक्षा कठीण असते कांदा कापणे. कांदा कापतान हमखास डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. खाली काही टिप्स दिल्यात ज्यामुळे कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येणार नाहीत.

टिप्स

  • दोन्ही बाजूंनी कांदा कापा आणि काही वेळ थंड पाण्यात ठेवा. त्यानंतर कांद्यावरील साल काढून तो कापा.

  • जर घाई असेल कापलेल्या कांद्याचे तुकडे पाण्यात टाका. त्यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही.

  • ज्या ठिकाणी कांदा कापत आहात त्या ठिकाणी मेणबत्ती अथवा लँप लावा. 

  • कांदा कापताना पंखा बंद करा. यामुळे कांदा कापताना डोळ्यांना अधिक त्रास होणार नाही.

  • कांदा कापण्याआधी ते १५ मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा.

  • कांदा कापतना तोंडात ब्रेडचा तुकडा ठेवा.