मुंबई : आपल्या रोजच्या जगण्यात अशा काही गोष्टी आहे, ज्या केल्याने तुम्हांला नक्की फायदा होतो. या गोष्टी आज आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहे.
१) मुंग्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी
घरात मुंग्या झाल्या असतील त्यांचा तुम्हांला खूप त्रास होत असतो. अशा वेळी काकडीचा वापर करावा. मुंग्यांना काकडी आवडत नाही. मुंग्या ज्या ठिकाणी आहे तेथे किंवा त्या वारुळाजवळ ठेवावी. मुंग्या लवकर गायब होतात.
२) आरसा साफ करा.
घरातील आरशावर नेहमी डाग असतात. आरसा साफ करण्याचा अनेक जण कंटाळा येतो. पण आरसा साफ करण्यासाठी स्पिरीटचा वापर करावा.
३) च्युइंगम कपड्यांना चिकटले तर...
कोणी खोडी काढली किंवा चुकून तुमच्या कपड्यांना च्युइंगम लागले. अशावेळी ते काढणे खूप अवघड काम असते. अशा वेळी कपडे निकामीही होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ज्या कपड्याला च्युइंगम लागले तो कपडा एक तास फ्रिजरमध्ये ठेवा. च्युइंगम कडक झाल्यावर ते आपोआप निघून जाईल.
उद्या वाचा कपड्यांना शाई लागली तर...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.