मुंबई : अॅसिडीटी म्हणजे काय, अॅसिडीचा त्रास कसा थांबवता येईल हे प्रश्न तुम्हाला अॅसिडीटी झाल्यावर सतावतात, सतत होणारी अॅसिडीटी हा देखिल तेवढाच गंभीर प्रश्न आहे.
अॅसिडीटी ही पाचनप्रणालीची सामान्य समस्या आहे. जेवल्यावर छातीत आणि गळ्यात जळजळ होते. मात्र थोडीशी खबरदारी घेऊन अशा अॅसिडीटीला दूर ठेवता येते.
आपली अन्ननलिका आणि आणि आतड्यांच्या मध्ये एक व्हॉल्व असतो. तो आतड्यात बनलेल्या पाचक रसाला वर जाण्यापासून रोखतो. या रसात एन्झाईम्ससोबतच हायड्रोक्लोरिक अॅसिडही असते. काही जणांच्यात हा व्हॉल्व सुस्त पडतो तेव्हा पचलेले जेवण, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि पाचक एन्झाईम्स आतड्यातून अन्ननलिकेत जाऊ लागतात.
या विकाराला वैद्यकीय परिबाषेत गॅस्ट्रोइसोङ्गेगियल रिफ्लेक्स असे म्हणतात. तो टाळण्यासाठी काही छोटे अन् सोपे उपाय आहेत.
जेवल्यावर कमीतकमी दोन-तीन तास झोपणे, खाली वाकणे आणि वळणे टाळा. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन-तीन तास आधी जेवण घ्या. जेवणानंतर शतपावली घेणे सर्वांत चांगले. किंवा पाठ टेकवून सरळ बसा.
झोपताना पलंगाचे डोके सहा इंच वर ठेवून झोपल्यानेही आम्ल अन्ननलिकेत जात नाही. खाण्यापिण्याच्या सवयींत बदल करा.
या पदार्थांमुळे वाढते अॅसिडीटी
तळलेले पदार्थ, हरभऱ्याची दाळ, लोणी-तूप चरबीयुक्त अन्न, टोमॅटो, कांदा, लाल मिरची, काळी मिरी, संत्रे, मोसंबी, चॉकलेट आणि पेपरमिंट गॅस्ट्रोइसोङ्गेगियल व्हॉल्वला मंद करतात.
जेवणाचे ताट अशा पदार्थांविना नीरस जरूर होईल, पण हे पदार्थ टाळणेच हिताचे आहे. त्याशिवाय चहा-कॉङ्गी आणि कोलासारखी शीतपेये, तंबाखू आणि मद्यपानही टाळणे आवश्यक आहे.
कमी खाण्याचे सुख
जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात पोटावर जबरदस्ती करू नका. जास्त जेवल्याने आरोग्य बिघडते. याचे कारण अतिरीक्त जेवण पोट साठवू शकत नाही. भरपूर पाणी प्या. त्यामुळे अन्ननलिकेची स्वच्छता होईल आणि छातीतील जळजळ पळून जाईल.
वजन नियंत्रणात ठेवा
पोटावर चरबीचा थर जमल्यासही गॅस्ट्रोइसोङ्गेगियल व्हॉल्व निष्क्रीय होऊ लागतो.
अँटॅसिड
कधीतरी होणार्या जळजळ, अपचनावर अँटॅसिड आणि गोळ्या घेणे ठीक आहे. डायजिन, जेल्युसिल, म्युकेन हे उपयोगी पडतात. परंतु, त्या सतत घेणे चांगले नाही. काही अँटॅसिड्समुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. काहींत सोडियम असल्याने रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.