अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पदार्थ का शिजवू नये?

जर तुम्ही दररोज जेवणासाठी अॅल्युमियम फॉईलचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Updated: Jul 25, 2016, 04:21 PM IST
अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पदार्थ का शिजवू नये? title=

लंडन : जर तुम्ही दररोज जेवणासाठी अॅल्युमियम फॉईलचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की अॅल्युमिनियम फॉईलमध्ये शिजवलेलेले अथवा गुंडाळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरावर परिणाम होतो.

जेव्हा अॅल्युमिनियम फॉईलमध्ये अन्न शिजवले जाते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अॅल्युमिनियम अन्नात मिसळते. आणि हे अन्न खाल्ल्याने त्यावाटे शरीरात जाते. यामुळे हाडांचे आजार तसेच ब्रेन सेल्सची वाढ कमी होण्याची शक्यता असते.