न्यूयॉर्क : पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयघाताचा धोका जास्त असतो. हॉस्पीटलमध्ये हृदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलंय. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय.
'येल स्कूल ऑफ मेडिसीन'च्या मूळ भारतीय शोधकर्त्या आकृती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, 'कमी वयाच्या महिला हृदयाविकाराला खूप सहजासहजी बळी पडतात. कमी वयाच्या पुरुषांपेक्षा ज्यास्त कमी वयाच्या महिलांना हृदयविकाराच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं'.
गुप्ता आणि त्यांच्या टीमनं 2001-10 या दरम्यान हृदयविकाराच्या कारणामुळे हॉस्पीटलमध्ये भरती झालेल्या 2,30,684 महिलांबद्दल माहिती गोळा केली. या सर्व महिलांचं वय 30-54 दरम्यान होतं.
या आकड्यांचा अभ्यास करताना, 55 वयाच्या महिलेपेक्षा कमी वयातील महिलांना हृद्यविकाराच्या कारणामुळे हॉस्पीटलमध्ये भर्ती होण्याच्या प्रमाणात बिलकूल घट झालेली आढळलेली नाही. मात्र, अधिक वयाच्या हॉस्पीटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण मात्र 20 टक्क्यांनी कमी झालंय.
या अभ्यासात असंही लक्षात आलं की पुरुषांमध्ये अधिक कोलेस्ट्रॉलची समस्या अधिक आढळते. तर महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराची समस्या सगळ्यात जास्त आढळते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.