कोलकाता : कोलकाता शहरातील साल्ट लेक येथे पोलिसांनी धाड टाकली आहे, यात पॉर्न सिनेमा तयार करणाऱ्या २८ जणांना अटक करण्यात आली आहे. हा सिनेमा तयार केल्यानंतर या सिनेमाच्या क्लिप, या काही पॉर्न साईटवर अपलोड केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
आरोपींनी यासाठी एक हॉल भाड्याने घेतला होता. अटक केलेल्या २८ जणांमध्ये सात महिला मॉडेल आणि पाच पुरूष मॉडेल्सचा समावेश आहे. शुटिंग करत असताना या लोकांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
सौम्या रॉयला अटक करण्यात आली आहे, सौम्याने शुटिंगसाठी मॉडेल्स जमवल्याचे सांगण्यात येत आहे. हॉलच्या मालकालाही शुटिंगची परवानगी दिल्याच्या कारणावरून ताब्यात घेतलं आहे.
या मॉडेल्सना हजार रूपये रोजाने आणण्यात आलं होतं, कॅमेरामनला मात्र एका दिवसासाठी ३५ हजार रूपये दिले जाणार होते, सुत्रांच्या माहितीनुसार प्रत्येक दिवशी शुटिंगसाठी ८७ हजार रूपये खर्च होता.