नवी दिल्ली : राष्ट्रीय शौर्य पदकासाठी महाराष्ट्रातील चार मुलांची निवड झाली आहे. त्यातील गौरव कवडूजी सहस्त्रबुद्धे या नागपूर येथील विद्यार्थ्याला मरणोपांत शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानं बुडत असलेल्या चार मुलांचा जीव वाचवला होता.
मुंबईचा मोहीत दळवी, निलेश भिल आणि वैभव घांगरे यांनीही पूरामध्ये इतर मुलांना वाचविल्यामुळे 26 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्यांना शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे.