नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
जम्मू आणि काश्मीर विधानसभा मतदारसंघाच्या १६ जागांसाठी मतदान होते. दरम्यान अलिकडेच दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असतानाही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत तसेच थंडी असताना जम्मू काश्मीरमध्ये चांगल्या मतदानाची नोंद झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.