१० गोष्टींमुळे होऊ शकतो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत.

Updated: Dec 22, 2015, 08:08 PM IST
१० गोष्टींमुळे होऊ शकतो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल  title=

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आलंय. यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागायचा. मात्र या कायद्यामुळं अॅट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणा-या अधिका-यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. 

अॅट्रॉसिटी विधेयकात आणखी काही तरतुदी करण्यात आला आहे. त्या गोष्टी केल्या तरी संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार आहेत. 

या गोष्टी केल्यास होणार गुन्हा दाखल :

१- गळ्यात चपलांचा हार घालणे.

२- बळजबरीने आणि चुकीच्या पद्धतीने जमीन बळकाविणे.

३- देवदासी आणि त्याच्यासारख्या प्रथा परंपरांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्ती करणे.

४- मानवी आणि प्राण्यांचे मृतदेह वाहून नेण्याची, हाताने मैला वाहून नेण्याची सक्ती करणे.

५- विशिष्ट व्यक्तीला अथवा पक्षाला मतदान करण्याची किंवा न करण्याची सक्ती करणे.

६- जातीचा किंवा आदिवासी जमातीचा सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करून हिणविणे.

७- ख्यातनाम आणि आदरणीय मृत व्यक्तींच्या नावाचा अनुल्लेख करणे.

८- सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराची धमकी देणे किंवा प्रत्यक्षात तसे घडवून आणणे.

९- पूजेचे कोणतेही ठिकाण, शिक्षण आणि आरोग्यविषयक संस्था आदी सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्यास प्रतिबंध करणे.

१०- दलित आणि आदिवासी स्त्रियांचे लैंगिक शोषण करणे, त्यांच्याविरुद्ध अश्लील शेरेबाजी करणे.