नवी दिल्ली : बहुचर्चित बालगुन्हेगार विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळं आता सुधारित कायदा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
आता बालगुन्हेगाराचे वय १८ वरून १६ वर्ष करण्यात येण्याला राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे.
बालगुन्हेगार न्याय कायदा आणखी कठोर करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी आज महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी विधेयक राज्यसभेत मांडलं. काँग्रेससह सगळेच विरोधी पक्ष या कायद्याचं समर्थन करत आहेत.
सुधारणांचं हे विधेयक मंजूर होईल देखील. मात्र, रविवारीच निर्भया बलात्कार प्रकरणातला अल्पवयीन आरोपी सुटला आहे. त्याच्या सुटकेला स्थगिती देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं नाकारली.
यावेळी कायद्याच्या दुबळ्या तरतूदींमुळे आम्ही हतबल आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. या पार्श्वभूमी राज्यसभेत आज हे विधेयक मंजूर होऊ शकतं. सध्या या विधेयकाबाबत राज्यसभेत चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या विधेयवरील चर्चेदरम्यान निर्भयाचे आईवडिल उपस्थित आहेत.