Budget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...

Budget 2025 Share Market : अर्थसंकल्प सादर होत असताना कोणता शेअर तुम्हाला देणार समाधानकारक परतावा? जाणून घ्या एका क्लिकवर... 

सायली पाटील | Updated: Feb 1, 2025, 07:38 AM IST
Budget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...  title=
Budget 2025 Share Market stocks to buy Experts stock picks Exide Industries

Budget 2025 Share Market : देशातील अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर बाजारात अनेक हालचालींना वेग आला असून, कैक शेअरची किंमत रेकॉर्ड हाय लेवलहून कमी होत 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. याच पडझडीच्या काळात मोदी सरकार 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सागर करणार आहे. तत्पूर्वी शेअर बाजाराचे जाणकार आणि सहकारी वाहिनी झी बिझनेसच्या मुख्य संपादकपदी असणाऱ्या अनिल सिंघवी यांनी नेमके कोणते शेअर खरेदी करावेत याविषयीचं मार्गदर्शन केलं आहे. 

देशातील सर्वात मोठ्या बॅटरी तयार करणाऱ्या Exide Industries या कंपनीच्या शेअरना त्यांनी पसंती दिली असून, पुढील एक ते तीन वर्षांसाठीच्या कालावधीत या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास याचा सकारात्मक फायदा मिळेल. 

हेसुद्धा वाचा : अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

हा शेअर या स्तरावरून दुपटीपर्यंत जाऊ शकतो. त्याशिवाय प्रत्येक वेळी जेव्हाजेव्हा या शेअरची किंमत 10 टक्के पडेल तेव्हा यामध्ये गुंतवणूक करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. Exide Industries च्या शेअरची किंमत 360 रुपयांच्या जवळपास असून, सिंघवी यांनी यासाठी तीन टार्गेट सांगितले आहेत. यामध्ये पहिला स्तर 500, दुसरा 600 आणि तिसरा 725 रुपये इतका आहे. सद्यस्थितीला असणाऱ्या दराहून हे तिन्ही टार्गेट दुपटीत असून, शेअरची किंमत 10 टक्के घटल्यास एसआयपी करत राहणं हा मार्ग त्यांनी सुचवला. या शेअरनं 2024 मध्ये 620 रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला होता. 52 आठवड्यांमधील या उच्चांकी उसळीनंतर हा शेअर 290 रुपयांपर्यंत कोसळला होता. 

Exide Industries हा जवळपास 70 वर्षे जुना ब्रँड असून, देशातील सर्वात जुन्या बॅटरी उत्पादक कंपन्यांपैकी एक अशी या कंपनीची ओळख आहे. प्रामुख्यानं ही कंपनी लेड अॅसिड बॅटरी डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग आणि सेल्सचं काम करते. याशिवाय ऑटोमोबाईल, पॉवर, टेलिकॉम, इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, UPS सिस्टीम, रेल्वे, मायनिंग आणि डिफेंस यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ही कंपनी सेवा देते. 

शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असून कृपया नियम व अटी वाचून तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घ्या. )