चारधाम : उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा अडचणीत सापडलीय. जोरदार पावसामुळे अनेक यात्रेकरु अडकलेत. पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.
केदारनाथ धामच्या मार्गात असलेल्या मंदाकिनी नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं अगस्त मुनि, चंद्रपुरी, सिसली आणि गंगानगर भागातील लोकांनी घरं रिकामी केली आहेत.
बद्रीनाथ धामच्या रसत्यातील अलकनंदा नदीच्याही पातळीत वाढ झाल्यानं लामबगडमध्ये रस्ताच पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय. दोन्ही नद्यां धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यानं चिंतेचं वातावरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.